Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सटाणा ताराहाबाद रोडवरील पंपावर दरोड्यांचा प्रयत्न;वेळीच कर्मचारी सावध झाल्याने चोरटे फरार..

दि . 19/04/2019

-बागलाण मध्ये ताराहाबाद रोडवर  करंजाड  फाट्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर रात्री ८.३० च्या दरम्यान दरोडा घालण्याचा प्रयत्न.

-कर्मचारी किरकोळ जखमी.

-केबिन मधील कर्मचारी वेळीच सावध झाल्याने चोरट्यांना केबिन उघडणे शक्य झाले नाही.

-बाहेरच्या कर्मचाऱ्यांकढून धार धार शास्त्राचा धाक दाखवत चोरट्यांनी त्यांच्या हातातील २६ हजारची रोकड घेऊन ते फरार झाले.

-या घटनेची माहिती मिळताच जयखेडा स्टेशन पोलीस निरीक्षक गणेश गुरव घटनास्थळी दाखल झाले. आणि घटनेची माहिती घेऊन त्वरित नाकाबंदी आणि गस्त वाढवण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

-गेल्या काही दिवसापूर्वी ताराहाबाद-मुल्हेर रोडवरील पंपावर देखील अशीच घटना घडली होती आणि त्याच प्रकारे तसेच चोरटे असल्याचे सांगितले जाते.

-पोलीस प्रशासनाने या घटनेनंतर पुन्हा अशी घटना घडून येऊ नये यासाठी उपाय आखावा आणि त्यांच्या मुसक्या अवळाव्यात अशी मागणी होत आहे.


ताज्या बातम्या