Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी भरपगारी सुटी

दि . 18/04/2019

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता 02- धुळे लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी 02-धुळे लोकसभा मतदारसंघातील दुकाने व आस्थापना, निवासी  हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, व्यापारी आस्थापना, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादि आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या नियम 135 ब नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे सरकारी कामगार अधिकारी कि.क.जोशी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे आदेशित  केले आहे.

            त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन, उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून अधिसुचना व परिपत्रकाद्वारे सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तसेच कामगार आयुक्त ,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पाठविलेल्या पत्रातूनही निर्देश प्राप्त झाले आहेत. सदरच्या आदेशांची अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी जिल्हा स्तरावर नियंत्रण/ दक्षता कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

            या आदेशानुसार धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या दिवशी एकही  कामगार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व कामगारांना भरपगारी सार्वजनिक सुटी जाहिर केलेली असून अपवादत्मक परिस्थितीत ज्या औद्योगिक आस्थापना बंद ठेवल्याने त्यांचे नुकसान होत असेल अशा आस्थापनेतील कामगारांना मतदान करण्यासाठी  किमान 2 ते 3 तासांसाठी  सुटी देणे त्या संबंधित आस्थापनांना बंधनकारक करण्यात आलेले आहे, मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.

            उद्योग व कामगार विभागातंर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाना, दुकाने इत्यादीच्या मालकांनी/ व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करतो येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरूध्द योग्य कारवाई करण्यात येईल. सर्व उद्योजक, आस्थापना मालकांना त्यांचे उद्योगात/ आस्थापनेत कार्यरत असलेल्या मतदार कामगार/ अधिकारी/ कर्मचारी यांना वर नमुद केल्याप्रमाणे सुट्टी अथवा सवलत देण्याबाबत कि.क.जोशी सरकारी कामगार अधिकारी, धुळे यांनी आवाहन केले आहे.


ताज्या बातम्या