Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव मतदार संघात महायुती-आघाडीत चुरस; कौल कोणाला?

दि . 18/04/2019

 

डॉ. सुभाष भामरे यांना विजयी करण्यासाठी मालेगाव विधानसभा मतदार संघात राज्यमंत्री दादा भुसे हे देखील प्रचारात उतरले आहेत.महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा मतदार संघात जोरात प्रचार सुरु आहे.मात्र, दुसरीकडे याच मालेगाव विधानसभा मतदार संघात अद्वय हिरे हे कुणाल पाटील यांचा प्रचार करून डॉ. भामरे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे मालेगावमधून कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळणार याविषयी चर्चा सुरू आहे.

धुळे लोकसभा मतदार संघासाठी येत्या 29 एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचारासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. धुळे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे आणि आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील हे मतदार संघात जोरात प्रचार करताना दिसत आहेत. धुळे लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा क्षेत्र येतात. त्यापैकी मालेगाव विधानसभा क्षेत्र हे अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे. मालेगावमधून सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे आमदार दादा भुसे हे मैदानात उतरले आहेत. मात्र भुसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुभाष भामरे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असल्याने याठिकाणी भुसे यांचा प्रचंड कस लागत आहे. तर दुसरीकडे पूर्वी भाजपमध्ये असलेले आणि भामरे यांच्यावरील नाराजीमुळे काँग्रेसमध्ये गेलेले मालेगावमधील युवा नेतृत्व अद्वय हिरे हे कुणाल पाटील यांचा प्रचार करताना दिसत आहेत. प्रचाराच्या या चित्रामुळे धुळे लोकसभा मतदार संघातील मालेगावमधून कोणत्या उमेदवाराला किती मताधिक्य मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मालेगावमधून सुभाष भामरे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा दादा भुसे यांनी संकल्प केला आहे. मात्र त्यांना टक्कर देण्यासाठी अद्वय हिरे आणि तुषार शेवाळे हे पुढे सरसावले आहेत.

या मतदार संघात शिवसेना-भाजप हेच एकमेकांचे शत्रू असताना आता युती झाल्याने येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र फिरावे लागत आहे. याठिकाणी कुणाल पाटील यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी अद्वय हिरे आणि तुषार शेवाळे यांच्यावर आहे.

दादा भुसे यांचा या ठिकाणी प्रचंड प्रभाव आहे. तो प्रभाव कमी करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. यामुळे या मतदार संघाचे निवडणुकीच्या निकालात किती आणि कसे योगदान राहते हे बघणे महत्वाचे असणार आहे.


काय आहेत मालेगावमधील जातीय समीकरणे ?

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात पक्षीय पातळीवर शिवसेना तर जातीय समीकरणांचा आढावा घेतला, तर याठिकाणी मराठा पाटील समाजाचे प्राबल्य आहे. मराठा पाटील समाजाचे 40 ते 42 टक्के मतदार आहेत. तसेच 15 टक्के माळी, 10 टक्के मुस्लीम, 15 ते 16 टक्के दलित, आणि उर्वरित आदिवासी, वाणी, मारवाडी, यासह इतर समाज घटक आहेत.


 


ताज्या बातम्या