Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




चांदवड शहरात दोन जिवलग मित्रात वाद;एकाने दुसऱ्याला धार धार चाकूने भोसकल्याने मृत्यू..

दि . 18/04/2019

चांदवड शहरात दोन जिवलग मित्रात वाद.एकाने दुसऱ्याला धार धार चाकूने भोसकले.

-चांदवड बस स्थानका समोरील रसवंती जवळील घटना.

-सद्दाम फारूक शेख असे मृत मुलाचे नाव.

अज्ञात कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून येथील बसस्थानकातील रसवंतीगृहासमोर एका मित्राने दुसऱ्या मित्राचा धारदार तीक्ष्ण हत्याराने छातीत भोसकून खून केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 
चांदवड येथील एसटी बसस्थानकावरील श्री साई आराधना रसवंतीगृहासमोर बुधवारी (दि. १७) दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास सद्दाम फारुख शेख (२५, रा. चांदवड) व प्रेम निवृत्ती पवार (रा. आडगाव, ता. चांदवड) यांच्यात अज्ञात कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे वादात रूपांतर होऊन प्रेम पवार याने त्याच्याजवळ असलेल्या तीक्ष्ण हत्याराने सद्दाम याच्या छातीत, पोटात वार केल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत जागेवर कोसळला. घटनेनंतर जखमी अवस्थेतील सद्दाम यास परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. 


ताज्या बातम्या