Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जिल्यातील देवळा,सटाणा आणि दिंडोरीत वीज कोसळून तिघांचा मृत्यू..

दि . 16/04/2019

 पिंटू बापू शिंदे (वय -३०)
 हौशाबाई फकीरा कुंवर वय 72
देवळा वाजगाव विज पडुन मृत्यू सायंकाळी⬆
 सपत शंकर ऊदार वय 65 दिडोरी येथे विज पडून ठार⬆ सायंकाळी..
 
जायखेडा येथील पाडगण शिवारात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास वीज कोसळून मेंढपाळ जागीच ठार झाला. मयत तरुणाचे नाव पिंटू बापू शिंदे (वय -३०) असून साक्री तालुक्यातील आयने येथील रहिवाशी असल्याचे समजते. 

 

    दुष्काळामुळे गावाकडे मेंढ्यांसाठी चारा-पाणी उपलब्ध नसल्यामुळे जायखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून तो मेंढ्या चारीत होता. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळवाऱ्यासह धुवाधार अवकाळी पाऊस सुरु झाल्याने पिंटू ने जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी अचानक वीज कोसळल्याने यात त्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शनीने सांगितले. त्याचे नातेवाईक व अन्य मेंढपाळांनी त्यास घाबरलेल्या अवस्थेत लागलीच त्याच्या मुळगावी घेवून गेल्याने अधिक माहिती समजू शकली नाही. 


ताज्या बातम्या