Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
नांदुरी यावल एसटीचा देवळा जवळ अपघात, अपघातात १५ प्रवाशी जखमी.

दि . 16/04/2019

ANCHOR

 सप्तश्रृंगी गडावरून दर्शन घेऊन जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला देवळा मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात झालाय..या अपघातात एकतीस भाविक जखमी झाले आहेत ता तीन जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे पाठविण्यात आले आहे देवळा तालुक्यातील खुंटेवाडी गावाजवळील करला नाल्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकडून बसचा ताबा सुटला असता हा अपघात झाला त्यात चालक व वाहक यांच्यासह एकतीस प्रवासी जखमी झाले आहेत विशेष म्हणजे अपघात झाला त्या वेळी संरक्षण राज्यमंत्री नामदार सुभाष भामरे हे सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी जात होते त्यांच्या समोरच अपघात झाल्याने स्वतः भामरे यांनी जखमींना बाहेर काढले व सोबत असलेल्या गाडीमधून जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी त्यांच्यासोबत धुळे येथील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते..सप्तशृंगी देवीचा यात्रा उत्सव काळात खानदेशातील लाखो भाविक परिवहन महामंडळाच्या  गाड्यांनी दर्शनासाठी येत असतात मागील काळातही बसचे अनेक वेळा अपघात झाले आहेत आणि बस चालक अतिशय वेगात बस चालवत असल्यामुळे नेहमीच गंभीर अपघात घडत असतात त्यामुळे परिवहन महामंडळाच अशा मुजोर चालकांकडे लक्ष नाही का असा प्रश्न आता उपस्थित होतोय..


ताज्या बातम्या