Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पायी चालणाऱ्या देवीभक्तांंना कळवणजवळ  क्रुझरने उडवले, अपघातात तीन ठार तर दोन भाविक जखमी...

दि . 16/04/2019

कळवण प्रतिनिधी-चैत्रोत्सवानिमित्त गडावर पायी चालत जाणाऱ्या भाविकांना क्रुझर गाडीने उडवल्याने झालेल्या अपघातात तीन भाविक ठार झाले तर दोन भाविक जखमी झाले आहेत.सोमवारी पहाटे चार वाजता ही दुर्घटना घडली.
             देवळा तालुक्यातील गुंजाळनगर,खालप परिसरातील देवीभक्त सप्तशृंगीच्या दर्शनासाठी जात असतांना हा अपघात घडला.
यात शुभम बापु देवरे (वय-16) हा जागीच ठार झाला तर भाऊसाहेब पुंडलिक पवार (15), कल्पेश रविंद्र सूर्यवंशी (25) यांच्यासह  30 ते 35 वयोगटातील दोन भावीक जखमी झाले होते.जखमींना कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान,नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आलेल्या दोन भाविकांचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या प्रकरणी कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ताज्या बातम्या