Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सुहास कांदे यांना नाशिक शहर बंदीच्या अटीवर अटकपूर्व जामीन

दि . 16/04/2019

शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत शहरात प्रवेश न करण्याच्या अटीवर न्यायालयाने दिली. सोमवारी (दि. १५) उच्च न्यायालयात कांदे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. 
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. कांदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कांदे यांच्यातर्फे अॅड. अनिकेत निकम यांनी युक्तीवाद केला. कांदे राजकीय क्षेत्रातील असल्याने खोटे आरोप केले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोट्या गुन्ह्यात गोवण्यात येत असल्याचा युक्तीवाद निकम यांनी केला. सरकारतर्फे अॅड. जाधव यांनी बाजू मांडली. पोलिसातर्फे जामीन अर्जास विरोध करण्यात आला. न्यायमूर्ती देशमुख यांनी दोषारोपपत्र दाखल होत नाही, तोपर्यंत काही अटीवर जामीन मंजूर केला. 

(creadit-DM)

 


ताज्या बातम्या