Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
उमराणे,देवळा बाजार समित्यांच्या निवडणुका हाेणार ३१ मेनंतरच

दि . 16/04/2019

निवडणूक आणि दुष्काळ या दोन्ही बाबी एकाच वेळी राज्यात सुरू असल्याने जिल्ह्यातील देवळा, उमराणे, घोटी आणि सुरगाणा या चारही कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक ३१ मेनंतर घेतली जाणार आहे. तसे आदेशही राज्य शासनाने काढले आहे. 
देवळा, घोटी, उमराणे आणि सुरगाणा या चार बाजार समित्यांचा कालावधी याचदरम्यान संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवडणुका याच कालावधीत घेतल्या जाणार होत्या. परंतु, राज्य शासनाच्या आदेशानुसार आता त्यांच्या निवडणुका ३१ मेनंतर घेतल्या जाणार असल्याचे निवडणूक विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. 
या समित्यांबाबत निर्णय 
देवळा : सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ती संपुष्टात येत आहे. 
उमराणे : या कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक आहे. त्यामुळे निवडणूक घेणे अत्यावश्यक होते. 
घोटी : या कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत ३१ मार्चलाच संपुष्टात आली आहे. तेथील संचालक मंडळ मुदतवाढीसाठी हायकाेर्टात गेले आहे. 
सुरगाणा : मुदत संपली आहे. परंतु निधीअभावी निवडणूक रखडली होती. ती या दोन महिन्यांत घेणे आवश्यक होते. 

 

 


ताज्या बातम्या