Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जिल्ह्यात बेमोसमी पावसाची हजेरी; वादळात झाडं कोसळून एकचा मृत्यू तर एक गंभीर जखमी..

दि . 15/04/2019

वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. देवळा तालुक्याच्या पूर्वभागात अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. अचानक वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाला सुरवात झाली. त्यात येथील मिलिंद राणे यांचे स्टेट बँकेचे २० लाखांचे कर्ज घेऊन बांधलेले पॉलिहाउस व शेड नेटचे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच, शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे तयार करण्यासाठी लावलेले डोंगळे ही वाऱ्याने भुईसपाट झाले. काढणी करून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी मोठी तारांबळ उडाली. तर जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा इतरत्र उडून गेल्याने पशुपालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाबावाडी येथील ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह कार्यक्रमाचा मंडप उडाला. पावसाच्या वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
मालेगाव शहर तालुक्यासह बेमोसमी पावसाची हजेरी यात गारा आणि जोरदार वादळ असल्याने या वादळामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली नुकताच काढून पडलेल्या कांदा अद्याप पावेतो चाळीत भरलेला नसल्याने मोठे नुकसान.शेतकरी चिंतेत.  वादळामुळे  अनेक  शेतकऱ्यांचे  जनावरांसाठी बनवलेली छत उडाल्याची घटना घडल्या.मालेगाव शहरातील दोन ठिकाणी मुख्य रस्त्यालगत असलेले झाड कोसळले या कोसळलेल्या झाडांमुळे मालेगाव शहरातील वादळी वाऱ्यामुळे गवती बंगला चौकात दोन मोठे झाड कोसळले,झाडाखाली एक मोटारसायकल स्वार दाबला गेला.तर,शहरातील मद्यवर्ती टेंशन चौकात झाड रिक्षावर कोसळून एक गंभीर जखमी.
 


ताज्या बातम्या