Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पावसाच्या सरींनी मालेगावकर सुखावले रविवारी सायंकाळी शहरात पावसाच्या तुरळक सरी

दि . 14/04/2019

- उत्तर मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी
- हवामान खात्याची माहिती 
- वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
- नाशिक, पुणे, अहमदनगर या भागात पाऊस 

मालेगाव - शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना सुखद दिलासा मिळाला आहे. रविवारी सायंकाळी अचानक झालेल्या पावसाच्या सरींनी मालेगावकर सुखावले आहेत. रविवारी देखील तापमान ४२ अंश से. पर्यंत गेल्याने दिवसभर उकाडा कायम होता. सायंकाळी मात्र काही क्षणासाठी आलेल्या पावसाच्या सरींनी उकाडा काहीसा कमी झाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शहरात मात्र गेल्या दोन दिवसापासून प्रचंड ऊन वाढले असून उकाडा देखील वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. रविवारी रात्री मालेगाव शहरात तुरळक पावसाच्या सरी व ढगांचा कडकडाट झाला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.


ताज्या बातम्या