Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
वडनेर येथे अँपे रिक्षा पलटी;पंधरा शेतमजूरांसह प्रवासी जखमी..

दि . 12/04/2019

मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथे शेतमजुरांची मजूर घेऊन जाणाऱ्या रिक्षा पलटी होऊन भीषण अपघात 15 प्रवासी जखमी.
तालुकाभारत शेतमजुरांची कमतरता असल्याने परिसरातील शेतकरी मजूर मजुरीसाठी बाहेरगावी ये-जा करत असतात परंतू, असेच  वाहतुक करत असताना वाहतूकदारांकडून रिक्षा पलटी झाली.रिक्षेत एकूण 20 प्रवासी होते त्यापैकी 15 गंभीर जखमी आहे. वाहन चालक दारूच्या नशेत असल्याचे प्रथमदर्शीनी सांगितले.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर येथे आरोग्य अधिकारी गैरहजर असल्याने या रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी मालेगाव सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे.यापूर्वीही याच परिसरात सतरा महिलांचा मृत्यू झाला होता. तरीही,प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.


ताज्या बातम्या