Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
२ विद्यमान नगरसेवकांसह सहा जण मालेगावातून हद्दपार;उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश ..

दि . 12/04/2019

मालेगाव:लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहा जणांना शहर व तालुक्यातून ३० एप्रिलपर्यंत हद्दपार करण्यात आले आहे. यात एमआयएमचे नगरसेवक अब्दुल माजिद माेहम्मद युनूस व काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक अब्दुुल मालिक माेहम्मद युनूस या दाेघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. 
कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत पाेलिस प्रशासनाने काही उपद्रवींचे हद्दपारी प्रस्ताव सादर केले हाेते. कलम १४४ (२) अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आली हाेती. निवडणूक काळात कुठलाही उपद्रव नकाे म्हणून उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा यांनी दाखल प्रस्तावांची तातडीने सुनावणी घेतली. सर्व राजकीय दबाव झुगारून हद्दपारीचे आदेश देण्यात आले. यात दाेघा नगरसेवकांसह सहा जणांचा समावेश . हद्दपारीचे आदेश संबंधित पाेलिस ठाण्यांकडे पाठविण्यात आले . संबंधितांना हद्दपारीचे आदेश बजावले जात आहे. ज्यांनी आदेशाच्या नाेटिसा घेतल्या नाहीत त्यांच्या घराबाहेर तसेच त्या भागातील दर्शनी ठिकाणी नाेटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. 
पाेलिस व महसूल विभागाने उपद्रवींच्या कायदेशीर मुसक्या आवळून निवडणूक काळातील शांतता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 
यापूर्वी नऊ गुन्हेगार हद्दपार 
मार्च महिन्याच्या अखेरीस नऊ सराईत गुन्हेगारांना नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांमधून वर्षासाठी तडिपार केले अाहे. कायदा व सुव्यवस्थेत कुठलीही तडजाेड नकाे अशी स्पष्ट भूमिका पाेलिसांनी घेतली आहे. 

यांच्यावर कारवाई 
अब्दुल माजिद माेहम्मद युनूस, अब्दुल मालिक माेहम्मद युनूस, रवींद्र सुरेश अाहिरे, साेमनाथ गाेरख शेलार, माेहदीस शकील अहमद, सय्यद शकील अहमद. 

उल्लंघन केल्यास अटक 

हद्दपारी आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे. हद्दपार काळात संबंधित शहरात आढळले तर त्यांना अटक केली जाईल. हद्दपार उपद्रवींच्या हालचालींवर पाेलिसांचे लक्ष आहे. - अजित हगवणे, पोलिस उपअधीक्षक, कॅम्प विभाग 


ताज्या बातम्या