Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अमळनेरात महायुतीच्या मेळाव्यात राडा;गिरीश महाजन मध्यस्ती करत असतांना त्यांनाही धक्काबुक्की..

दि . 10/04/2019

अमळनेर शहरात महायुतीच्या मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष  उदय वाघ आणि माजी आमदार बी एस पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्याचे  रूपांतर मारामारीत झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे आणि या घटनेने मेळावा उधळला गेला चित्र अमळनेर येथे बघायला मिळाला आहे. जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ यांना तिकीट देण्यावरून बी एस पाटील यांचा कायम विरोध होता. असं समोर येतंय आणि यातूनच सभामंडपात वाद झाला आणि व्यासपीठावरच दोघांमध्ये मारामारी झाली आहे. गिरीश महाजन यांची मध्यस्थाची भूमिका.
महायुतीच्या मेळाव्यात भर स्टेजवरच  ऱाडा भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी एस पाटील यांच्यात जोरदार हाणामारी. तर दोघांचे समर्थक एकमेकांविरोधात मारामारीत उतरले गिरीश महाजन यांना सुद्धा धक्काबुक्की झालेली आहे गिरीश महाजन यांनी भांडण मारामारी सोडवण्याचा प्रयत्न करताना त्यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आल्याचे चित्र बघायला मिळाले संपूर्णपणे महायुतीचा मेळावा उधळला गेला आहे.


ताज्या बातम्या