Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
शहीद जवानांच्या कुटुंबियांना वडगावातील तरुणांचा मदतीचा हात

दि . 09/04/2019

मालेगाव - स्वतःसाठी जगणारे तर सगळेच असतात पण देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे आपले भारतीय जवान असतात. मालेगांव तालुक्यातील भिलकोट गावातील वीर जवान मंगेश रंगराव निकम हे २५ मार्च २०१९ रोजी बारमेडा राजस्थान येथे भारतमातेची देशसेवा करतांना वीरगती प्राप्त झाली. शहीद वीर जवान मंगेश रंगराव निकम त्यांच्या घरी जाऊन वडगांवातील तरूण मुलांनी भेट घेऊन त्यांच्या परिवाराला वडगांवातील तरूण मुले व गावातील नागरिक यांनी सैनिक निधी जमा करून आर्थिक स्वरूपात भिलकोट येथिल निकम परिवाराला आर्थिक मदत केली. यावेळी अनिल खैरनार, माहीराज महाजन, बाळा शेवाळे, अमोल ठोके, गणेश वाघ, किरण शेलार  वडगांव ग्रामस्थ व युवा मित्र परिवार आदी उपस्थित होते.


ताज्या बातम्या