Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
आराई येथे सटाणा वैद्यकीय पथकाचा बोगस डॉक्टर छापा;सरपंचासह ग्रामस्थांनीच केला बोगस डॉक्टराचा भांडाफोड..

दि . 09/04/2019

-के.डी.गोसावी असे बोगस डॉक्टरचे नाव.

-आराई येथे अचानक वैद्यकीय पथकाने बोगस डाॅक्टरच्या क्लिनिककवर छापा टाकल्याने तालुक्यात खळबळ.
-डिग्री नाही त्याच्याकडे तालुक्यात अनेक ठिकाणी अजूनही अनेक गावामध्ये सर्रासपणे डिग्री नसतांना बोगस क्लिनिक सुरू आहेत.

गेल्या आठ ते नऊ वर्षापासून सटाणा तालुक्यातील आराई या गावात बोगस डॉक्टर के डी गोसावी याने आपला वैद्यकीय व्यवसाय थाटला होता.ग्रामीण भागात बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या दवाखान्याची कोणतीही परवानगी नाल्याची आरोग्य विभागाने कोणतीही खातरजमा आजतागायत केली का नसावी असा प्रश्न ग्रामस्थ तसेच सरपंच धीरज सोनवणे यांना पडला. ग्रामपंचायतीची ही कुठल्याही प्रकारची परवानगी या डॉक्टरने घेतली नव्हती. तथापी गावातील एका रुग्णाला उपचारादरम्यान रिएक्शन झाले.त्यानंतर सरपंच तथा ग्रामस्थांना बोगस असल्याची कुणकुण लागली.आणि त्यांच्या माहितीनुसार बोगस डॉक्टर असल्याचं सिद्ध ही झाले. परंतु,या बाबतीत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील केले. या पत्र व्यवहाराला कुठेतरी प्रतिउत्तर व कारवाई होताना दिसत नव्हती. म्हणून त्यांनी सरळ सरळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी,नायब तहसीलदार सटाणा यांच्या पथकाने आज दुपारी एकच्या दरम्यान या बोगस डॉक्टरच्या क्लिनिक वर छापा टाकला छापा टाकला. छापा टाकल्यानंतर  हा डॉक्टर  बोगस असल्याचे  स्पष्ट दिसून येत असल्याचे  तालुका आरोग्य अधिकारी  हेमंत अहिरराव यांनी सांगितले.दरम्यान त्याच्याकडे औषधे आणि प्रमाणपत्र आढळून आले. याबाबतीत सर्व कागदपत्रे आणि औषधे यांचा पंचनामा करून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी पाठवण्यात आले आहेत.
आराईचे ग्रामपंचायत सरपंच धीरज सोनवणे व सदस्य राहूल आहेर यांनी आरोग्य विभागाकडे बोगस डाॅक्टरविषयी तक्रार केली होती. या डाॅक्टराचे फक्त बारावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याच्याकडे बोगस डिग्री मिळाली आहे. एकतर आधीच आरोग्य विभागाने डॉक्टर डॉक्टर कार्यवाही करण्यात दिरंगाई केली आहे आतातरी याच्यावरती पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याबाबतीत कुठेही आर्थिक हितसंबंध जोपासले जाऊनये. अशा बोगस डॉक्टरांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.


ताज्या बातम्या