Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
सटाणा नाक्यावर जुगारी अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाची कार्यवाही; भाजपाच्या माजी महानगर जिल्हाप्रमुखांसह 25 जणांवर गुन्हा दाखल..

दि . 08/04/2019

मालेगाव शहरातील सटाणा नाका परिसरातील एकता जिमखाना शेजारील एका गोडाउन मध्ये जुगार खेळत असल्याच्या संशयावरून मालेगाव विशेष पोलीस पथकाकडून रात्री एक वाजेच्या दरम्यान छापा टाकण्यात आला. यावेळी जुगार खेळताना २४ आरोपी ताब्यात घेण्यात आलेत.तसेच भाजपाचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या कार्यालयाशेजारी यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये हा व्यवसाय चालत असल्याने पोलिसांनी त्यांनाही आरोपी केले आहे.याबाबतीत तसा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आला आहे.मुद्देमालात एकूण ७,८२,८९० रुपयांचे साहित्य,साधने व रोख रक्कम छावणी पोलिसांनी जप्त केली आहे.
यात भाजपाचे माजी महानगर जिल्हाप्रमुख गायकवाड यांचा नावाचा उल्लेख झाल्याने परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले  आहे.

 

यावेळी महानगर प्रमुख सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता दुसरे म्हणजे सदरची जागा ही मागेल अनेक दशकांपासून ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी भाडे तत्वावर दिलेली आहे.त्यामुळे सदर जागेत काय सुरू होते याची कल्पना आमच्या कुटुंबाला नाही.त्यामुळे असल्या कोणत्याही बेकायदा कृत्याला माझे समर्थन नसतांना या कारवाईत  गोवण्यात आलेले माझे नाव हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. मी एका जबाबदार पक्षाचा जबाबदार माझी पदाधिकारी व प्रदेश कार्यकारणी सदस्य असल्याने या कारवाईत टाकण्यात आलेले माझे नाव हा राजकीय षडयंत्राचा भाग असण्याची दाट शक्यता आहे.अशा मोठ्या राजकीय षडयंत्रांचा या आधी पण मी बळी ठरलेलो आहे. मी एक वेळा पुन्हा खुलासा करतो की सदर जुगाराशी माझा काही एक संबंध नसून पोलिसांनी केलेल्या कारवाईचे मी स्वागत व समर्थन करतो.असे गायकवाड यांनी सांगितले.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक नीलोत्पल,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित हगवणे, विशेष पथकाचे प्रमुख सचिन वांगडे, छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक यांच्यासह देविदास ठोके, शरद देवरे,दिनेश पवार,अभिमन्यू भिलावे,सचिन वांगडे,महारू माळी,किरण दासरवार, सुभाष निकम,पंकज गुंजाळ, रणजित सोळूके,समाधान सानप,राहुल आहेर यांनी काम पाहिले.


ताज्या बातम्या