Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जिल्ह्यातील पहिली घटना कुणाल पाटील यांच्याविरुद्ध आचासंहिता भंगाचा गुन्हा;विना विनापरवानगी घेतली सभा..

दि . 07/04/2019

मालेगाव:- मालेगाव तालुक्यातील  सौंदाणे याठिकाणी धुळे मतदार संघातील लोकसभा मतदारसंघातील  उमेदवार  यांच्या प्रचारार्थ  सौंदाणे येथे  गावातील  ग्रामपंचायत हद्दीतील सभामंडपात  सभा घेण्यात आल्याने या सभेस कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती.निवडणूक कक्षाकडून व तालुका पोलीस स्टेशन  मालेगाव यांनी गुन्हा दाखल केला आहे .धुळे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील सह ६० ते ७० जणांवर  वर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल.उमेदवारावर गुन्हा दाखल होण्याची जिल्ह्यातील पहिली घटना मालेगाव तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल , तालुक्यातील सौदाने गावात परवानगी न घेता प्रचार सभा घेत मतदान करण्याचे आव्हान केल्याने करण्यात आला गुन्हा दाखल.पोलीस शिपाई सचिन दळवी यांनी याबाबतीत गुन्हा दाखल केला आहे.

 


ताज्या बातम्या