Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ईव्हीएम मशीन हाताळणी बद्दल आत्मविश्वास वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

दि . 07/04/2019

आज मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघातील एकूण ,२०७६ पैकी हजर २०३४ निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले. सदर प्रशिक्षण हे दोन सत्रांमध्ये झाले. सुरुवातीला उपकार चित्रमंदिर येथे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशीन ची हाताळणी व मतदान प्रक्रियेतील आवश्यक बाबी यांचे प्रशिक्षण दिले. दुसऱ्या सत्रामध्ये ए टी टी हायस्कूल येथे ईव्हीएम मशीनची हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी यांचेसाठी थंड पिण्याचे पाणी, चहा, बिस्किटे याची व्यवस्था करण्यात आलेली होती. सदर प्रशिक्षणासाठी शिक्षक व इतर कर्मचारी यांनी उत्सुकतेनं प्रश्न विचारून माहिती घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.यापूर्वी असे माहिती पूर्व प्रशिक्षण झाले नाही अशा प्रतिक्रिया काही प्रशिक्षणार्थी यांनी यावेळी व्यक्त केल्या.सदर इव्हीएम व्ही व्ही पॅट  हाताळणी प्रशिक्षण सर्व  सेक्टर अधिकारी यांनी घेतले. सेक्टर अधिकारी किरण शिंदे, भास्कर जाधव,जि झेड अहिरे यांचे विषेश प्रशिक्षणार्थी शैलीमुळे त्यांचे प्रशिक्षण वर्गामध्ये इतर प्रशिक्षणार्थ्यांनी देखील येऊन प्रशिक्षण घेतले.पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी दिले तर ईव्हीएम चे हाताळणी प्रशिक्षण तहसीलदार नरेश बहिरम यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले. निवडणूक नायब तहसीलदार रमेश वळवी व निवडणूक पर्यवेक्षक प्रवीण खैरनार यांनी याकामी विशेष योगदान दिले.या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थी मधील न्यूनगंड कमी होऊन ईव्हीएम मशीन हाताळणी बद्दल त्यांचा आत्मविश्वास वाढला. उपकार सिनेमा गृह याठिकाणी प्रशिक्षणाचे दरम्यान वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी ट्राफिक पोलीस यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली होती. अनुपस्थित ४२ कर्मचारी यांच्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांनी यावेळी सांगितले.


ताज्या बातम्या