Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
पसायदान प्रतिष्ठान तर्फे अध्यात्मिक व्यक्तिमत्व विकास शिबिर .२० ते ३० एप्रिल दरम्यान झोडगे येथे आयोजन ; नावनोंदणी सुरु

दि . 06/04/2019

मालेगाव -  प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या अध्यात्मिक व्यक्तिमत्व विकासासाठी मालेगाव तालुक्यातील कंधाणे येथील ' पसायदान प्रतिष्ठा'  तर्फे विद्यार्थांच्या उन्हाळी सुटीचा सदुपयोग करण्यासाठी २० ते ३०  एप्रिल दरम्यान अध्यात्मिक व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजवर दहा शिबीरेे यशस्वी झालीत. गेल्या दहा वर्षात शिबीराने चांगले गायक, चांगले व्यावसायिक कीर्तनकार, जिज्ञासू साधक, एकाग्रताप्रिय विद्यार्थी, गुणी कलावंत, कर्मप्रवृत्त तरुण समाजाला दिलेत. यंदा देखील शिबिरात नाविन्यपूर्ण कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज गांगुर्डे यांनी सांगितले.

शिबिराचे हे अकरावे  वर्षे आहे. सद्याच्या काळ हा मुलांची एकाग्रता, कर्मशीलता, सृजनशीलता, आत्मविश्वास, निर्भयता या गुणांच्या मुळावर उठला आहे. मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. मुले चंचल झालीत. मुलांच्या मनात सतत भीती असते. मुलांना आत्मविश्वास राहिला नाही. मुले कलहप्रिय झालीत. मुलांमधील निसर्गप्रेम संपत चालले. मुलांमधील हे नकारात्मक परिवर्तन पालकांसाठी निराशाजनक आहे. यावर केवळ अध्यात्म हे संपूर्ण उत्तर नाही. मुलांना या स्पर्धेच्या या काळात टिकायचे आहे. कुटूंबासाठी एक जबाबदार कुटुंबप्रमुख, आणि समाजासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून मुलांनी घडणे आता काळाची गरज आहे.

यावर्षी शिबिरात नाविन्यपूर्ण उपक्रमात स्वतःला सिद्ध करणाऱ्या, शून्यातून पूर्णत्वाकडे झेप घेणाऱ्या कर्तृत्ववान नागरिकांच्या यशोगाथा त्यांच्याच तोंडून व्याख्यानाद्वारे ऐकायला मिळतील. ज्यामुळे मुलांमधील आत्मविश्वास वाढेल. कलावंतांच्या भेटीतून सृजनशीलता वाढेल. विचारवंतांच्या सहवासातुन मुलांमधील विवेक वाढेल. सोबत अध्यात्मिक उद्बोधन असणारच आहे. समाजात, शेतात, कारखान्यात, सरकारी कार्यालयात अव्याहत चालणाऱ्या रचनात्मक किंवा निर्माणकारी कामांना क्षेत्रभेट देऊन समाजोपयोगी कामे कशी चालतात हे प्रत्यक्ष क्षेत्रभेटीतून मुलांना दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुलांमधल्या कर्तृत्वगुणांचा विकास होणार आहे.सद्याच्या काळात उद्योजकता विद्यार्थ्यांच्या स्वभावात भिनावी त्यासाठी उद्योजकांचे मार्गदर्शन मुलांना देण्याचा  प्रयत्न शिबिरातून केला जाणार असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले. या उन्हाळी सुटीचा सदुपयोग करण्यासाठी इयत्ता  चौथी ते बारावीच्या विद्यार्थांनी  शिबीरासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थांनी आपली नावे ९८५०३१५०३५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून त्वरित नोंदवावीत. प्रवेश मर्यादित असल्याने त्वरित नावे नोंदवून  प्रवेश नक्की करावा.

*शिबिरातील दैनदिन उपक्रम*

हरिपाठ, रामरक्षा, अभंग,ओव्यांची व श्लोकांची संथा, गायन, वादन कौशल्य , खेळ, श्रमप्रतिष्ठा, सांस्कृतिक कार्यक्रम , मान्यवरांची व्याख्याने, मान्यवरांच्या यशोगाथा, छत्रपती शिवचरित्रकथन होणार आहे. यंदा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि वृक्षांचे कमी झालेले प्रमाण लक्षात घेता शिबिरात खास जलसाक्षरता व वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला आहे . तसेच  तसेच शिबिरात प्रवेश हवा आहे, त्यांनी येतांना सोबत, आपल्या परिसरातील वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या जास्तीत जास्त बिया आणाव्यात.असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.


ताज्या बातम्या