Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
या 10 सोप्या घरगुती उपायांनी राहा उन्हाळ्यातही कुल

दि . 05/04/2019

उन्हाचा वाढता पारा आणि उन्हाच्या झळांपासून असं करा आपलं संरक्षण

 उन्हाचा पारा वाढता आहे. तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला आहे.  दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या चटक्यांनी नागरिकच नाही तर प्राणीही हैराण झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतीचे प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत.  पुढच्या काही दिवसांत अधिक उष्णता वाढण्याची शक्यता आहे. पण ह्या उकाड्यापासून वाचण्यासाठी काही खास घरगुती टिप्स

 

1.उन्हाळ्यात घरांच्या भिंतींवर शक्य असेल तर पाणी मारा. घरामध्ये फरशीवर किंवा कोबा असेल तर थंड पाण्यात भिजवलेलं कापड जमिनीवर पसरवून ठेवा. ज्यामुळे घरात थंडावा निर्माण होतो.

2.घरातील कळशी, पिंप किंवा पाण्याच्या बाटलीला थंड पाण्यात भिजवलेलं कॉटनचं कापड गुंडाळा त्यामुळे पाणी थंड राहील.

3.फ्रिजमधील पाण्याऐवजी माठातील पाणी प्या. माठातील पाणी प्यायल्यानं तहानही भागेल आणि कुठलाही त्रास होणार नाही.

 

4.बाहेरचं तेलकट, तिखट खाणं टाळा, संतुलित आहारावर भर द्या.

5.जास्तीत जास्त फळ, ज्यूस, ताक, दही. दूध यांचा आहारात समावेश करा.

6.दिवसातून दोन वेळा स्वच्छ आंघोळ करा. बाहेर असाल तर सतत तोंड हात-पाय स्वच्छ धुवत राहा.

7.स्वच्छ कपडे घाला, घामाचे कपडे वापरल्यानं तुम्हाला त्वचारोग, फंगल इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो

8.चेहऱ्यावर घाम आला असेल तर मेकअप करू नका त्यामुळे तुमची त्वचा खराब होण्याचा धोका संभवतो.  चेहऱ्यावरील मेकअप व्यवस्थित पुसा.

9.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना गॉगल, स्कार्फ, छत्री सोबत ठेवा.

10. कामाशिवाय कुठेही बाहेर पडू नका, सनस्क्रीन लावा, टिशू पेपर किंवा मऊ रूमाल घाम पुसण्यासाठी सोबत ठेवा.


ताज्या बातम्या