Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जळगावमधून उन्मेष पाटील यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

दि . 05/04/2019

येथील जी. एम. फाऊंडेशन येथे सभा झाल्यानंतर आमदार उन्मेष पाटील यांनी दुपारी एक वाजता जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी  गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, चदुलाल पटेल, स्मिता वाघ, माजी आमदार गुरुमुख जगवणी, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लंठ्ठा, माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह मोठ्‍या सख्यने नगरसेवक, पदाधिकारी, समर्थक उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी आम्हाला नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत. गटातटाचे राजकारण करायचे नाही. हा मतदार संघ भाजपचा आहे. आम्हाला देशाची सेवा करायची आहे, अशी भूमिका मांडली. 

यावेळी विद्यमान आमदार व जळगाव लोकसभेच्या पूर्वीच्या उमेदवार स्‍मिताताई वाघ  म्हणाल्या की, मला संघटनेने जी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडली आहे. आम्ही प्रामाणिक व निष्ठेने काम करीत आलो आहोत. त्याच प्रामाणिकपणाचे फळ मिळाले असेल असे म्हणून आपली नाराजी व्यक्त केली.


ताज्या बातम्या