Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
धुळे मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारीचा मिटेना गाेंधळ

दि . 05/04/2019

धुळे लाेकसभा मतदारसंघात भारिप व वंचित बहुजन आघाडीने राज्यात सर्वप्रथम आपला पहिला उमेदवार घाेषित केला. यामुळे याकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधले गेले. आघाडी व पदाधिकाऱ्यांच्या फायद्या ताेट्यांच्या अभ्यासात इतर समर्थकांच्या अपेक्षांमध्ये देखील आता वाढ झाली आहे. 
आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी धुळे मतदार संघातील मालेगाव शहरात सर्वप्रथम आपल्या पक्षाची जाहिर सभा घेतली. सभेला अपेक्षेपेक्षा चांगली गर्दी खेचण्यात ते यशस्वी ठरले. याच सभेत अांबेडकर यांनी आघाडीतर्फे कमाल हाशिम यांच्या उमेदवारीची घाेषणा करतानाच आपल्या उमेदवाराला व्यासपीठावर आणले हाेते. त्यामुळे मतदार संघातील पहिलीच सभा व राज्यात सर्वप्रथम उमेदवाराची घाेषणा ही आघाडीची केवळ आरंभशुरता ठरली आहे. कमाल हाशिम यांची जाहीर उमेदवारी घाेषित असताना त्यांच्या एेवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नबी अहमद यांचे नाव चर्चेत अाले. त्यामुळे कमाल हाशिम यांनी सपाचे नेते अामदार अबू अाझमी यांच्याशी संपर्क करत उमेदवारीची चर्चा केली. बसपा-सपा अाघाडीकडून त्यांची उमेदवारी निश्चित हाेत असतानाच काेणत्या निवडणूक चिन्हावर उमेदवारी करायची यावर तडजाेड फिस्कटली. पुन्हा अाघाडीच्या नेत्यांना उमेदवारीवर विश्वास व्यक्त करण्यासाठी कमाल हाशिम यशस्वी झाले. त्यामुळे अाता पक्षाचा 'एबी' फाॅर्मच घेवून पत्रकार परिषदेत घाेषणा करण्याची तयारी त्यांनी केली हाेती. यासाठी बुधवारी (दि.३) उर्दू -मराठी पत्रकारांना निमंत्रित करण्यात अाले हाेते. मात्र, कमाल हाशिम फिरकलेच नाहीत. त्यामुळे पत्रकार देखील माघारी फिरले. अाघाडीकडून एबी फाॅर्मच मिळाला नसल्याचे गुरुवारी (दि.४) स्पष्ट झाले.


ताज्या बातम्या