Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगाव पंचायत समितीच्या इमारतीत नाक झाकून का जावे लागते...

दि . 03/04/2019

मालेगाव तालुका ग्रामपंचायतीचे मिनी मंत्रालय अर्थात पंचायत समितीचे नूतन प्रशासकीय इमारत. सध्या एका वेगळ्या समस्येने ग्रासले गेली आहे. ग्रामीण भागातील जनतेला अधिक सोयी व जलद गतीने कामे व्हावीत म्हणून भव्य प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे.मात्र या इमारती कामानिमित्त जावे लागण्यात लागणाऱ्या प्रत्येक माणसाला इमारतीत प्रवेश करून प्रवेश करीत असताना प्रवेशद्वारापासूनच नाकाला कपडा लावावा लागतो. कारण प्रवेश द्वाराजवळ असलेला स्वच्छतागृहाची दुर्गंधी पसरलेली जाणवते. त्यामुळेच नाकाला कपडा लावल्याशिवाय पर्याय नसतो.कोट्यवधी रुपये खर्च करून इमारत उभी राहिली प्रवेश प्रत्यक्ष कामकाज या इमारतीत सुरू झाले आहे.मात्र,केवळ स्वच्छतागृह साफसफाई होत नसल्याने ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. इमारतीत तालुक्यातील येणाऱ्या जनतेबरोबरच या इमारतीत कामकाज करणारे अधिकारी अथवा कर्मचारी सर्वांना ही समस्या भेडसावत असली तरी या समस्येचे निराकरण कसे व्हावे याचा मात्र अद्याप काही विचार झालेला दिसत नाही.

 


ताज्या बातम्या