Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जुन्नरमध्ये पिंपळवंडीत मोठा शस्त्रसाठा जप्त

दि . 03/04/2019

  • HOME
  • BREAKING NEWS
  • जुन्नरमध्ये पिंपळवंडीत मोठा शस्त्रसाठा जप्त

जुन्नरमध्ये पिंपळवंडीत मोठा शस्त्रसाठा जप्त

Jai Maharashtra News

 Facebook Twitter Google+ LinkedIn WhatsApp Email Print 0Shares

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात येत आहे. यामध्ये पोलीसांची गस्त ही वाढवण्यात आली आहे.यातच जुन्नरच्या पिंपळवंडी गावातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.राजेश अभंग यांच्या घरात सापडला शस्त्रसाठा सापडला आहे.नारायणगाव जवळील अभंग गावात शस्त्रसाठा  सापडला आहे. निवडणूकांच्या तोंडावर असा शस्त्रसाठा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीसांकडून ही शस्त्र जप्त

जुन्नरमाध्ये राजेश अभंग यांच्या घरात हा शस्त्रसाठा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

राजेश यांच्या घरातून ५ पाईप बॉम्ब, कट्टे, रिव्हॉल्वर आणि तलवारीसह धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत.

राजेश अभंग यांना बॉम्ब बनविण्याचा शौक असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

2004 ला त्यांनी घरगुती वादतुन बॉम्ब उडवला होता.

एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

निवडणूकांच्या तोंडावर असा शस्त्रसाठा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


ताज्या बातम्या