Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
तालुका क्रीडा संकुलात निवडणूक आयोगाकडून मनाई आदेश लागू..

दि . 31/03/2019

तालुका क्रीडा संकुल, बीएसएनएल कार्यालय शेजारी,मालेगाव येथे मनाई आदेश लागू...


 तालुका क्रीडा संकुल, बीएसएनएल कार्यालय शेजारी,मालेगाव येथे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम निश्चित केलेली आहे. तेथे ईव्हीएम मशीन पोलिस बंदोबस्त व सिसिटिव्ही निरीक्षणाखाली ठेवलेले आहेत.तथापि त्याठिकाणी तालुका क्रीडा संकुल परिसरात संध्याकाळच्या वेळी अनेक नागरिकांचा वावर असतो व त्यामुळे ईव्हीएम मशिनच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचू शकते. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, धुळे व जिल्हा पोलीस अधीक्षक, नाशिक यांनी आवश्यक ते प्रतिबंधात्मक काढणे बाबत सहा निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ यांना निर्देशित केलेले होते...
त्याअनुसार सदर परिसरामध्ये निवडणुकीच्या कर्तव्यार्थ नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे व्यतिरिक्त इतर सर्वांना *31 मार्च 2019 पासून ते 30 एप्रिल 2019 पर्यंत* फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे.लोकसभा निवडणुकीचे सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,सेक्टर अधिकारी, फ्लाईंग स्काॅड पथक प्रमुख, चेकपोस्ट पथक प्रमुख यांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता अन्वये  *विशेष कार्यकारी दंडाधिकारी* घोषित करण्यात आलेले आहे. त्या अधिकाराचा वापर करून गणेश मिसाळ, विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 चे उपकलम 1 व उपकलम 3 अन्वये सर्वांना नोटीस बजावणे शक्य नसल्याने सदर मनाई आदेश एक तर्फा लागू केलेला आहे. सदर आदेशाची अवमानना केल्यास संबंधिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करणे बाबत कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश देखील संबंधित पोलीस अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.


ताज्या बातम्या