Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
निवडणूक प्रक्रियेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस पाटलांची भूमिका महत्वाची- गणेश मिसाळ..

दि . 30/03/2019

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील यांची भूमिका व जबाबदारी महत्त्वाची... सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ

पोलीस पाटील हे कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. नेहमीप्रमाणे पोलीस पाटील यांना गावामध्ये याकामी मदत करण्याचे सूचित करण्यात आलेले आहे. पोलीस पाटील यांची या संदर्भात एक बैठक देखील घेण्यात आलेली आहे.पोलीस पाटील हे कायदा व सुव्यवस्था राखण्यात प्रशासनाचे कान व डोळे म्हणून गावांमध्ये काम करतात.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बिएलओ व मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी येणारे कर्मचाऱ्यांचे पथक (पोलिंग पार्टी) यांना देखील आवश्यक ते गावात सहकार्य करण्याचे निर्देश सर्व पोलीस पाटील यांना देण्यात आलेले आहेत. तसेच गावांमध्ये मतदानाच्या दिवशी काही अप्रिय घटना घडल्यास तातडीने संबंधित पोलीस स्टेशन व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना याबाबत कळविण्याच्या सूचना देखील त्यांना दिलेल्या  आहेत.
तसेच पोलीस पाटील यांनी अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी गावामध्ये जनजागृती करणे व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी,तलाठी, मंडळाधिकारी व सेक्टर अधिकारी यांचे बरोबर समन्वय ठेवणे आवश्यक आहे.


ताज्या बातम्या