Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
जळगावमध्ये एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने खळबळ..

दि . 30/03/2019

जळगाव: एकाच परिवारातील  तिघांनी गळफास घेत सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलेला आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात टोनगाव येथे ही घटना घडली आहे.आठ दिवसांपूर्वी बब्बू सय्यद यांच्या याच परिवारातील  नऊ वर्ष मुलाचा इसाम चा  निर्घुणपणे खून करून,अज्ञात इसमा कडून त्याचा मृतदेह शेतामध्ये छिन्नविच्छिन्न अवस्थेत टाकल्याचे आढळून आले होते. त्यापूर्वी आठ दिवस आधी हा मुलगा बेपत्ता होता त्या घटनेचा उलगडा अद्याप झालेला नसताना  आता या मुलाच्या आई-वडील आणि बहिणीने सामुहिक आत्महत्या केली आहे त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे. बांगडी व्यवसायिक असलेल्या परिवाराच्या   या खोलीचा दरवाजा आतून बंद होता तरीसुद्धा आत्महत्या की घातपात असा संशय आता व्यक्त केलजात आहे.


ताज्या बातम्या