Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात तापमानाने ४२ शी ओलांडली. उकाडा वाढला; उष्णतेमुळे रुग्णसंख्येत वाढ..

दि . 30/03/2019

मालेगाव शहरात उन्हाचा तडाखा वाढला. महाराष्ट्रात सध्या मालेगावचे तापमान दुसऱ्या क्रमांकावर..
अमरावती नंतर मालेगावात पार ४२.. 

मालेगाव - लोकसभेच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण गरम होत असताना सूर्यनारायण ही आग ओकु लागला आहे. काही दिवसांपासून मालेगाव शहरात उकाडा वाढल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. उन्हाचा पारा ४२ पार गेला. कमाल तापमान ४२ अंश से. तर किमान तापमान २०.२ अंश से. इतके नोंदवले गेले. उन्हाचा तडाखा वाढत आहे.
उष्णतेमुळे शहरी व ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारी १२ ते ४ पर्यंत लोकांनी बाहेर निघाणेच टाळले असल्याचे खाली रस्त्यावरून दिसून येत आहे. उष्णतेमुळे नागरी आरोग्यावरही स्पष्ट परिणाम जाणवत आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयात रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ झालीय. नागरिकांनी उन्हात निघणे टाळावे अथवा अत्यावश्यक असल्यास गॉगल, टोपी, उपरणे परिधान करूनच घराबाहेर पडावे, असा डॉक्टर सल्ला देत आहेत.


ताज्या बातम्या