Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
प्रशासनाच्या विरोधात शिक्षकांचा बंड; शिक्षकांचे आज सामूहिक रजा आंदोलन,वेळेचा घोळ मिटेना..

दि . 30/03/2019

मालेगाव - गेल्या तीन चार दिवसांपासून तापमान चांगलेच वाढले आहे. त्यात यंदा ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून दरवर्षी प्रमाणे जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळांची वेळ बदलली जाते. यंदा मात्र शाळांच्या वेळेचा हा घोळ कायम आहे. प्रशासनाकडून चौथ्यांदा शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला असून, नवीन वेळेसदेखील प्राथमिक शिक्षक समन्वय समितीकडून विरोध करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कारभारामुळे शनिवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे.


ताज्या बातम्या