Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
भिलकोट येथील जवान मंगेशचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...

दि . 26/03/2019

मालेगाव - मालेगाव तालुक्यातील भिलकोट या छोट्याशा खेडेगावातील वीर जवान मंगेश रंगराव निकम यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 36 वर्षांचे होते. देशसेवेत प्राणपणाने लढत असतांना त्यांना आजाराने ग्रासले. शत्रूपुढे निधड्या छातीने लढणाऱ्या या वीर जवानाची आजाराशी झुंज देतांना पुणे येथे प्राणज्योत मालवली.

मंगेश हे गेल्या सहा महिन्यापासून आजारी होते. पुणे येथील सैन्यदल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ऑगस्ट २००२ पासून ते भारतीय सैन्यदलात सेवेत होते. सध्या त्यांची नियुक्ती राजस्थान येथील बाडमेर येथे होती. सैन्यदलात कार्यरत असतानाच त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले. आजाराशी झुंज देताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
मंगेश यांच्या निधनाचे वृत्त समाजात माळमाथ्यासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव शरीर भिलकोट या गावी आणण्यात आले. यावेळी तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगेश यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. वीर जवान मंगेश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय भिलकोट गावी उपस्थित होता. साश्रु नयनांनी मंगेश यांना निरोप देण्यात आला.


ताज्या बातम्या