Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी सम्राट काकडे ..

दि . 22/03/2019

नामपूर:-बागलाण तालुक्यात गेल्या  अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुका अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याची उत्कंठा अखेर संपली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले बिजोरसे ग्राम पंचायतीचे सदस्य  सम्राट  निंबाजी काकडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार,माजी आमदार संजय चव्हाण यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक सावंत,तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी,शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,ज.ल.पाटील, आकाश पगार,शशी कोर, नितीन काकडे,उजेंद्र आहिरे,रोहीत आहीरे,प्रसाद दळवी असंख्य समर्थक उपस्थित होते.
आगामी काळात तळागाळातील जनतेच्या अडचणी सोडवून गाव तेथे शाखा स्थापन करून तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष सम्राट काकडे यांनी व्यक्त केली आहे.


ताज्या बातम्या