Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
क्रिकेटर गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश

दि . 22/03/2019

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीर याने भाजपात प्रवेश केला. गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केला असल्याचं यावेळी गौतम गंभीरने सांगितलं. देशासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल यावेळी गौतम गंभीरने भाजपाचे आभार मानले.


ताज्या बातम्या