Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
साडेचार लाखांचा गुटखा जप्त;जयखेडा पोलिसांची कार्यवाही

दि . 21/03/2019

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करून बागलाण तालुक्यात गुटखा आणला जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्याा मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक देवीदास पाटील, हवालदार राजेश साळवे, दिपक भगत, सुनील पाटील, नानाजी पाटील, निकेश कोळी व राहूल मोरे यांनी मंगळवारी (ता.१९) दुपारी साडे बाराच्या सुमारास अलियाबाद (ता.बागलाण) गावाजवळ सापळा रचून गस्त घातली होती. यादरम्यान मिनीपिकअप क्रमांक (एमएच.२०, इजी.२४१४) गुजरातहून भरधाव येत असतांना अडविली असतांना चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत खात्री केली असता दोन लाख ८८ हजारांचा विना लेबल वीस गोणीत हिरा पान मसाला शंभर पाकिटे तर एक लाख ४४ हजार किंमतीचे विना लेबल वीस गोणीत राॅयल ७१७ नावाचे तंबाखूजन्य शंभर पाकिटे आढळून आली. या मिनीपिकअपमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला. मिनी पिकअपसह सात लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जायखेडा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी गुटखा माफिया गुलाब बाबुलाल शेख (वय ३२, रा. सातारा, खंदोरा औरंगाबाद), शंकर धनराज सातपुते (वय३४, रा. बालाजीनगर, औरंगाबाद) व जितेंद्र अशोक परदेशी (वय४२, रा. कुंडलीनगर, औरंगाबाद) अन्न व औषध सुरक्षा आधिकारी प्रमोद पाटिल यांच्या फिर्यादीनुसार तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघा गुटखा माफियांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढिल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव करीत आहेत. 


ताज्या बातम्या