Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
खाखुर्डीत विहिरीत दबून दोन तरुणांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी होणार...

दि . 21/03/2019

मालेगाव तालुक्यातील खाखुर्डी गावात मोसम नदी लगत असल्याल्या एका विहिरीजवळ टाकलेला मातीचा ढिगार घसरून त्याखाली दोन युवकांचा दाबून मृत्यू झाला.या घटनेमुळे वडणेर खाखुर्डी सह परिसरातील गावामध्ये शोककळा पसरली. सकाळी घडलेल्या या घघटनेच्या नंतर या दोन्ही युवकांना काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अतोनात प्रत्यन केले शेवटी या दोघांचा मृत्यू झाला.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू दाखल केले जरी असले तरी.या ठिकाणची परिस्थिती पाहून चौकशी झाली पाहिजे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुरवातीला विहीर कोणाची असा प्रश्न निर्माण.विहीर गिरणा कारखान्याची,जागा मोसम नदी पात्राची आणि काम ग्रामपंचायतिच्या पदाधिकाऱ्यांचे. ग्रामसेवकांनी या कामा संदर्भात माहीत नसल्याचे सांगून बरेच काही सांगून दिले.
तहसीलदार राजपूत साहेब यांनी सदर घटनेची चौकशी करू असे सांगितले.एकंदरीत प्रकार पाहता नेमकं घडलेलं काय आणि कश्यामुळे या संदर्भात शंका उपस्थित केली जात आहे.विहीर बुजविण्याचे आणि भर टाकण्याचे कारण काहीही असो पण दोन निष्पाप तरुणांचा बळी गेला हे खरे या तरुणांची नावे-१)दीपक कासार २) समाधान चौधरी..

 


ताज्या बातम्या