Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मालेगावात पुन्हा १६ तलवारी हस्तगत

दि . 20/03/2019

मालेगाव- आगामी  निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पुन्हा १६ तलवारी हस्तगत केेल्या आहेेेत. कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याच अनुषंगाने अवैद्यरित्या हत्यार बाळगणार्‍या विरोधात पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे. आज, बुधवारी (दि.२०) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातीलच आझादनगर परिसरात अवैद्यरित्या धारदार शस्त्रे बाळगणार्‍या तिघा संशयीताना ताब्यात घेत त्यांच्याकडून १६ तलवारी जप्त केल्या. 

मोहमद यासीन मोहमद शकिल (रा.हकीमनगर), कासीम अन्सारी जलालुद्दीन अन्सारी (रा.मोमीनपुरा) व समीर अहमद बशीर अहमद (रा.हकिमनगर) या तिघांना आझादनगर व म्हाळदे शिवारातून पोलिसांनी ताब्यात घेतले. गत आठवड्यातही पोलिसांनी शहरातील अप्सरा हॉटेल परिसरातून १४ तलवारी व एक कुकरी अशी एकुण १५ घातक शस्त्रे हस्तगत केली होती. 

पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह व अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस निरीक्षक अशोक करपे, सहायक पोलिस निरीक्षक संदिप दुनगहु यांच्यासह पोलिस पथक शहरातील आझादनगर परिसरात अवैद्यरित्या शस्त्रे बाळगणार्‍या इसमांचा शोध घेण्यासाठी गस्त घालत होते. त्याचवेळी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही इसम आझादनगर परिसरात इसहाक हॉटेलसमोर अवैधरित्या शस्त्रे बाळगून संशयीतरीत्या वावरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या तिघांसह त्यांच्याकडे असणाऱ्या १६ धारदार तलवारी मिळाल्या. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


ताज्या बातम्या