Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
काम न करणाऱ्या ३२ बिएलओ यांचेवर दाखल करणार गुन्हे- मिसाळ

दि . 20/03/2019

मालेगाव- मालेगाव बाह्य विधानसभा मतदार मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रनिहाय एक बि एल ओ कार्यरत असून एकूण 308 बि एल ओ कार्यरत आहेत.हे सर्व बिएलओ मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम करत असतात. तसेच तयार झालेली स्मार्ट मतदान कार्ड वाटपाचे काम देखील करत असतात.तथापि एवढ्या मोठ्या संख्येवर नियंत्रण ठेवून आढावा घेणे वेळखाऊ असल्याने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दहा ते पंधरा बीएलओ यांचे वरती एक पर्यवेक्षक नेमण्याच्या सूचना असल्याने नुकतीच अशा सर्व पर्यवेक्षकांची नव्याने नेमणूक करण्यात आली. या सर्व नवनियुक्त 22 पर्यवेक्षीय अधिकारी यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. या सर्व बीएलओ पर्यवेक्षक यांना बिएलओ यांच्याशी समन्वय साधण्याचे काम व त्यांची जबाबदारी याची जाणीव करून देण्यात आली. तसेच व्ही व्ही पॅट मशीनचा डेमो देखील या पर्यवेक्षक यांना उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी,मालेगाव बाह्य यांनी करून दाखविला. सर्व बिएलओ यांनादेखील आवाहन करण्यात येते की त्यांनी या पर्यवेक्षकांच्या मार्गदर्शनानुसार नवीन मतदारांना नावनोंदणीसाठी मदत करून मतदार नोंदणी करावी व मतदार यादीत अपात्र असलेले मतदार यांचा मतदार वगळण्याचा फॉर्म क्रमांक 7 भरून घेऊ द्यावा. तसेच या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे पाच दिवस अगोदर सर्व मतदारांना वोटर स्लिप म्हणजेच मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप होणार आहे.या कामाचे देखील पर्यवेक्षण करण्याच्या सूचना या पर्यवेक्षकांना दिल्या.यापूर्वी घेण्यात येत असलेल्या बैठकीस 308 पैकी 223 बिएलओ कर्मचारी उपस्थित होते. अनुपस्थित 85 कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस देऊन 53 कर्मचारी यांनी काम सुरू केले.
*तरीही कामच न करणाऱ्या 32 बिएलओ कर्मचारी यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत...*
असे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ गणेश मिसाळ यांनी नमुद केले आहे.


ताज्या बातम्या