Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com




भाजपला धक्का, एकाच वेळी ८ आमदारांचा पक्षाला रामराम

दि . 20/03/2019

इटानगर - संपूर्ण देशात एकिकडे निवडणुकांच्या
रणांगणात पक्ष मोठ्या ताकदीने उतरत
असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे.
लोकसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवर ।
येऊन ठेपलेल्या असतानाच अरुणाचल प्रदेश येथे
दोन मंत्री आणि ६ आमदारांनी पक्षाला रामरम
केला आहे. भाजपतून बाहेर पडत या
नेतेमंडळींनी नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या
पक्षात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा
निवडणुकांची उमेदवारी न दिल्यामुळे नाराज
आमदारांनी ही बाहेरची वाट धरल्याचं स्पष्ट होत
आहे. ही परिस्थिती आणि पक्षांतर करणारे
नेतेमंडळी पाहता ८ आमदार आणि त्यांच्यासह
एकूण १२ पदाधिकारी अशा एकूण २० जणांनी एनपीपीत प्रवेश केला. राज्य सचिव जरपूरम गॅमलिन, राज्याचे गृहमंत्री
कुमार वै, पर्यटन मंत्री जरकार गॅमलिन आणि इतर
आमदारांनी उमेदवारी न दिल्याबद्दलची नाराजी
व्यक्त करत एनपीपीची वाट धरली. भाजपच्या
संसदीय समितीने रविवारी ६० सदस्यसंख्या
असणाच्या विधानसभेसाठी ५४ उमेदवारांची यादी
जाहीर केली होती. अरुणाचल प्रदेश येथे
विधानसभा आणि लोकसभा निवडणूका एकाच
दिवशी म्हणजे ११ एप्रिलला पार पडणार आहेत.


ताज्या बातम्या