Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
डॉ. सुभाष भामरे यांच्या समोर धुळे मतदारसंघात काँग्रेसकडून कुणाल पाटील..

दि . 19/03/2019

मालेगाव : - धुळे लोकसभा मतदार संघातून भाजपकडून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना अंतर्गत पक्षीय स्पर्धा नसली तरी, त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून कोण हेदेखील आता स्पष्ट झाले आहे.रोहिदास पाटील व मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्यात तिकिटासाठी स्पर्धा होती. त्यात पाटील यांचे दिल्ली अनुभवी वजन वरचढ ठरले. पक्षश्रेष्ठींनी वयाच्या सत्तरीकडे लक्ष वेधत पुत्र आमदार कुणाल पाटील यांना रिंगणात उतरविण्याची सूचना केल्याची जोरदार चर्चा होती. त्यासोबत कुणाल पाटील राज्यातच खुश असून, त्यांना दिल्लीचे वेध नसल्याचेही बोलले जात होते.

दरम्यान, आता काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर झाले असून यात अशोक चव्हाण (नांदेड), चारुलता टोकस (वर्धा), डॉ. अभय पाटील (अकोला), निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये (रामटेक), माणिकराव ठाकरे ( यवतमाळ ) आणि धुळ्यातून कुणाल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


ताज्या बातम्या