Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
मुल्हेर येथील पेट्रोल पंपावर धार धार शस्त्रे दाखवत ४६ हजारांची रोकड लंपास..

दि . 18/03/2019

बागलाण : दोघा सशस्त्र दुचाकीस्वारांनी पेट्रोलपंपावर लुटमार करित 46 हजारांची रोकड पळविल्याची घटना मुल्हेर गावाजवळील श्री उद्धवेश पेट्रोल पंपावर घडली. रविवारी (दि.17)  सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
अलियाबाद - ताहाराबाद रस्त्यावर श्री उद्धवेश पेट्रोल पंप आहे. रविवारी सायंकाळी दोन बाईकस्वार तेथे आले. त्यांनी तत्काळ कोयते हातात नाचवत पंप मॅनेजरच्या खोलीत प्रवेश केला. या अनपेक्षित प्रकाराने विनोद बोरसे हा कर्मचारी भयभीत झाला. त्याच्याजवळील  46 हजारांची रोकड हिसकावून घेत चोरट्यांनी क्षणात गुजरातच्या दिशेने धूम ठोकली. 
घटनेची माहिती मिळातच पंपमालक सिद्धेश शुक्ल यांनी जायखेडा पोलिसांना पाचारण केले.  सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी वायरलेसवर परिसरात नाकाबंदी केली. तसेच पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांची ओळख पटकवण्याचा प्रयत्न केला.


ताज्या बातम्या