Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
-सटाणा सुरत रस्त्यावर जिलेटीन कांड्या आणि डिटेनर जप्त; जायखेडा पोलिसांची कार्यवाही..

दि . 17/03/2019

 

-सटाणा सुरत रस्त्यावर जिलेटीन कांड्या आणि डिटेनर जप्त...

-रात्री उशिरा गस्त घालत असतांना जयखेडा पोलिसांनी संशय आल्याने तपासणी केली असता गाडीत मिळून आले जिलेटीन आणि डिटेनर..

-सटाणा हुन गुजरात कडे जात असतांना केली जायखेडा पोलिसांनी केली कार्यवाही..

-या ज्वलनशील वस्तूंची वाहतूक का आणि कुठे कश्यासाठी करणार होते.वाहन परवाना असेल तर भरधाव वेगाने पाळण्याच्या तयारीत का होते या बाबतीत जयखेडा पोलीस तपास करीत आहेत.

बाभुळणे (ता.बागलाण) येथील गुजरात राज्याच्या हद्दीवर मध्यरात्रीच्या सुमारास जायखेडा पोलिस गस्तीवर असतांना ३ लाख पस्तीस हजार शंभर रुपयांचे वाहनासह जिलेटिन दारूगोळा व डिटोनेर पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वाहनचालक  भवरलाल शंभुलाल गुंजर (वय२५) रा.कर्णीपुरा पंचायत छतरापुर ता.आशिन भिलवाडा, राजस्थान याला अटक केली असून बुदललाल तुलसिराम गुंजर हा फरार झाला आहे. जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली  शोध सुरू आहे

 


ताज्या बातम्या