Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो; शाह विद्यालयात श्री. हरीश मारू यांचे मार्गदशन संपन्न..

दि . 15/03/2019

मालेगाव – येथील वर्धमान शिक्षण संस्था संचालित श्री.र.वी.शाह विद्यालयात दि.१५ मार्च २०१९ शुक्रवार रोजी जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नाशिक जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य श्री. हरीश मारू यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक पटणी हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नितीन शाह, श्री.नटवरलाल वर्मा, श्री.कैलास शर्मा, श्री.जयघोष जाधव, श्री. राहुल आघारकर, बद्रीनारायण काला , प्राचार्य श्री.संजय बेलन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले. श्रीमती जे.टी.शेवाळे यांनी प्रमुख वक्ते श्री.हरीश मारू यांचा परिचय करून दिला. प्राचार्य श्री.संजय बेलन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री.हरीश मारू यांनी अत्यंत सोप्या शब्दात ग्राहक म्हणजे काय? ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकाचे हक्क व कर्तव्य या विषयी मार्गदर्शन केले.ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात वस्तू व सेवा खरेदी करतांना जागरूक राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात श्री.अशोक पटणी यांनी विद्यार्थ्यांनी समाजात ग्राहक कायद्याविषयी जनजागृती करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.पी.एस.पाटील यांनी केले. तर आभारप्रदर्शन श्री.व्ही.एन.कासार यांनी मानले. या व्याख्यानप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.


ताज्या बातम्या