Phone : 0253-2621666 | Mail: info@kasmademedia.com
अडीच वर्षीय बालिकेला वेठीस धरत विवाहिते कडून शरीर सुखाची मागणी;विकृताविरुद्ध विनयभंगाचा पावरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल..

दि . 12/03/2019

शहरातील शाहीन पार्क पावरवाडी येथील घटना.आरोपी अटक..


मालेगाव शहरातील सर्वे नंबर ८५ शाहीनपार्क या झोपड पट्टीत राहणारा हुजेर अत्तर सिराज अन्सारी या मनोविकृत इसमाने त्याच्या घरासमोर राहणारी दोन लेकरांच्या आईवर वाईट हेतून नजर ठेवून विनयभंग केला.या बाबत पीडित महिलेनं पवारवाडी पोलिसांत तक्रार दिली असून,तक्रारीत महिलेनं आपला पती मजुरी करतो.नेहमी प्रमाणे पती कामावर गेला असता समोर राहणार हुजेर अन्सारी याने सायंकाळी जबरी घरात प्रवेश करीत माझ्या अडीच वर्षीय मुलीला वेठीस धरत शरीर सुखाची मागणी करू लागला.यावेळी मुलीला त्याच्या ताब्यातून सोडवून घेतले असता त्याने अश्लील हरकत करीत मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्ये केल्याचं नमूद केलं आहे.सदर मनोविकृत तरुण त्याच्या आई वडिलांसोबत राहतो गेल्या दोन तीन दिवसांपासून पीडितेकडून पाहून अश्लील हावभाव करीत इशारे करीत होता.त्याचवेळी त्याला विरोध झाला नसल्यामुळे त्याने विकृत हरकत केली असावी.महिलेच्या आरडाओरड केल्याने शेजारी महिलेच्या बचावासाठी धावून येताच आरोपीने तेथून पलायन केलं होत.पवारवाडी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे पुडील तपास पोलीस करीत आहेत.


ताज्या बातम्या