कसमादे मीडिया हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर केंद्र व राज्य शासन, शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, पत्रकार परिषदांच्या बातम्या तसेच ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती व विचार प्रवण करणारे लेख, छायाचित्र, व्हिडीओ असलेले हे 24 × 7 वेबसाईट आणि मोबाईल अॅप लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा 'कसमादे मीडिया'चा मुख्य उद्देश आहे. सोशल नेटवर्किंगमुळे डिजिटल इंडियाच्या जमान्यात वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जगात आपणास माहिती ही तेवढ्याच वेगाने घेण्याची सवय होत आहे. त्यासाठीच कसमादे मीडियाचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. आम्ही आपणासाठी 'कसमादे मीडिया'च्या माध्यमातून परिसर ते महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊन येत आहोत. देशासह जगभरातील मुख्य घटना या वृत्तवाहिन्यांकडून तत्काळ समजतातच, पण आपल्या परिसरातील घटनांची माहिती आपणास दुसर्या दिवशीच्या वृत्तपत्राद्वारे मिळते. ते उल्लेखनीय तर आहेच पण झपाट्याने बदलत्या माहिती व तंत्रज्ञानाच्या जगात आपल्या शहराचीही आघाडी असावी. डिजीटलायझेशनच्या युगात परिसरातील घटनांची माहिती तत्काळ सर्वदूर पोहोचावी. आपल्या भागातील बरीचशी मंडळी ही नोकरी-कामधंद्यानिमित्त बाहेरगावी असते. त्यांनाही आपल्या परिसरातील बातम्या त्वरित कळाव्यात, म्हणजेच अफवांना लगाम लागेल. या दृष्टिकोनातून कळवण, देवळा, मालेगाव, बागलाण या भागातील माहिती एकाच व्यासपिठावरून देण्याचा हा प्रयत्न आहे.
कसमादे मीडियाच्या टीममध्ये पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू व अनुभवी तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून त्या-त्या भागातील घटना तत्काळ आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश 'कसमादेना मीडिया'ने डोळ्यासमोर ठेवला आहे. पत्रकारिता मूल्यांची साक्ष ठेऊन हे कार्य केले जाईल.
नोटीस : या वेबसाईटवर आणि अॅपवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांशी व लेखांमधून व्यक्त झालेल्या विचारांशी संपादक, संचालक आणि मालक सहमत असतीलच असे नाही. तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख किंवा मजकुरांसंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो मालेगाव अपर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कक्षेत राहिल.
----------------------------कसमादे मीडिया आपणासाठी देते....
वेबसाईटवर लिहिण्याची व छायाचित्रकार होण्याची संधी.
तरूण आणि लेखनाची आवड असणार्यांना कसमादे मीडिया न्यूज पोर्टलच्या स्तंभलेखकांमध्ये समाविष्ट करण्यात येईल.
कसमादे मीडियासाठी लेखनाची संधी खालीलप्रमाणे..
बातम्या आणि घटनांविषयीच्या प्रतिक्रिया, आपण ज्या क्षेत्रातील जाणकार आहात त्या क्षेत्रातील लेखन, चित्रपटांचे परीक्षण, तुमच्या परिसरातील सकारात्मक घटना, प्रकाशझोतात न आलेल्या व्यक्ती-संस्था यांचा अल्प परिचय, देशविदेशातील मराठी जगतातील घटना, इतरांसाठी आदर्श ठरू शकतो, असा अनुभव. (टिप : आकस, खालच्या पातळीची वैयक्तिक टिका नको.) समाजकारण, राजकारण, क्रीडा, देश-विदेश, मनोरंजन यापैकी लिखान मात्र अभ्यासपूर्ण असावे. त्याची मर्यादा 300 ते 400 शब्दांपेक्षा जास्त नको. याव्यतिरिक्त निसर्गाचे छायाचित्र, कार्यक्रमाचे व बातमी मूल्य असलेले, नागरी समस्यांचे छायाचित्र पाठवू शकतात.
कसमादे मीडियाशी आपणास लेख, प्रतिनिधीत्व, माहिती, जनसंपर्क यासाठी संपर्क साधावयाचा असल्यास खालील भ्रमणध्वणी क्रमांकांचा लाभ घ्यावा.
8087233999
8055233999
Copyright © 2016 - All Rights Reserved - Powered By Bytes System
NewsLetter Sign Up !
Please enter your Email and Name to join.
To unsubsribe please click here ».